काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा सोमवारी सितापूरमध्ये रोड शो सुरु असताना एका तरुणाने त्यांच्या दिशेने बुट फेकला. हा बूट फेकणा-या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पुढच्या काही महिन्यात होणा-या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी सध्या उत्तरप्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. सितापूरमध्ये रोड शो सुरु असताना ही घटना घडली.