महात्मा गांधींची हत्या व्यक्तव्यावरुन राहुल गांधींचे घूमजाव

महात्मा गांधींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केली, असं वक्तव्य करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आता घूमजाव केले आहे.

राहुल गांधींच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी आज सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण दिलं. गांधी हत्येसाठी आरएसएस संघटनेला दोषी धरावं अशी माझी भावना नव्हती. आरएसएस संबंधित लोकांचा गांधी हत्येत हात होता, असं म्हणण्याचा माझा उद्देश होता, असा खुलासा राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधींच्या याआधीच्या वक्तव्याला आक्षेप घेत, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. त्याबाबत स्पष्टीकरण देताना राहुल गांधींनी आपला पवित्रा बदलला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *