केंद्र सरकारने नागरिकांना आनंदाची बातमी दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रति लीटर एक रुपया, तर डिझेलचे दर प्रति लीटर दोन रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या दरांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची नव्याने रचना करण्यात येते. १ आणि १६ तारखेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्या आपल्या इंधन दरांत बदल करत असतात. यापूर्वी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे १६ जुलै रोजी २.२५ रूपयांनी तर डिझेल प्रति लिटरमागे ०.४२ पैशांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर ३१ जुलैला पेट्रोल दरात प्रति लिटर १ रुपया ४२ पैसे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर २ रुपये १० पैशांनी कपात करण्यात आली होती. याआधी ३१ जुलैला पेट्रोल दरात प्रति लिटर १ रुपया ४२ पैसे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर २ रुपये १० पैशांनी कपात करण्यात आली होती.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात
