प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ

बॅंकांच्या एक दिवसाच्या संपामुळे केंद्र सरकारने सर्व करदात्यांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत 31 जुलैवरून वाढवून 5 ऑगस्ट केली आहे.

याविषयी केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, की आजच्या बॅंकांच्या संपामुळे आणि जम्मू-काश्‍मीरमधील अशांत परिस्थितीमुळे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी देशभरात प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत 31 जुलै होती. ही मुदत आता 5 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. तेथील परिस्थितीमुळे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास या राज्यात अंतिम मुदत 31 ऑगस्ट असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *