सायन रुग्णालयात दोन तोंडाच्या बाळाचा जन्म

सायन रुग्णालयात दोन तोंडाच्या बाळाचा जन्म

सायन रुग्णालयात एका महिलेने दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. सयामी जुळ्या बाळांचा जन्म झाल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली.

सईन खान असे या महिलेचे नाव आहे. या मुलांना मिळून एक हृदय, एक फुप्फुस, एक यकृत, एक अन्ननलिक, एक गुद्वार आणि दोन मूत्रपिंड आहेत. त्यामुळे यापैकी एकाच बाळाला वाचवता येणार आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आठव्या महिन्यात रुग्णालयात आल्याने सईन खानची प्रसूती करण्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉ. यशवंत नंदनवार यांनी सांगितले. या सयामी जुळ्या बाळांना वेगळे करणे ही एक मोठी जबाबादारी आहे.

यासाठी सायन रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागातील डॉ. पारस कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली टीम काम करते आहे. आणखी काही चाचण्या करुन मगच शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येईल असे डॉ. पारस कोठारी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *