कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्याजवळ ट्रकने बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आठजणांचा जागीच मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले आहेत.
गुलबर्गा जिल्ह्यतील आळंद गावाजवळ हा अपघात झाला. उस्मानाबादमधील रहिवासी गाणगापूरच्या दिशेने क्रूझरमधून देवदर्शनासाठी निघाले होते.
क्रूझर आळंदजवळ आल्यानंतर एका मोठ्या ट्रकने क्रूझरला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये आठजण जागीच ठार झाले. तर पाचजण जखमी झाले.
जखमी झालेल्या प्रवाशांना गुलबर्गा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.