वाढत्या वयासोबत होणारे पांढरे केस अनेकांची समस्या असते. तरुण वयात होणारे पांढरे केस अनेकांना आपलं वय वाढल्याची भीती निर्माण करुन देत असतात. त्यामुळेच मग आपलं वय लपवण्यासाठी केसं काळे करणं, ते लपवणं असे प्रकार सुरु होतात. केसांवर कलरचा वापर केल्यास केस कमकुवत होतात. केस पांढरे होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, पण केस पांढरे होण्यापासून रोखणे आपल्या हातात आहे. काळे केस पांढरे होण्यापासून थांबवण्यासाठी आणि काळे राहण्यासाठी काही घरगुती उपाय तुमची मदत करु शकतात. यामध्ये आहाराचा समावेश असून हे नैसर्गिक पदार्थ केसांना लावले तरी आपले केस काळे होऊ शकतात.
कडीपत्ता –
पांढ-या होणा-या केसांसाठी कडीपत्ता खुप चांगला मानला जातो. आंघोळीच्या पाण्यात एक तास अगोदर काही कडीपत्त्याचे पाने टाका. नंतरच त्या पाण्याने केस धुवा. तुम्ही आवळ्या प्रमाणेच कडीपत्त्याला बारीक कापुन गरम खोब-याच्या तेल मिळवुन लावु शकता. हा प्रयोग नियमित केल्याने तुमचे पांढरे केस नक्की काळे होतील. तसंच यामध्ये आयर्न आणि फॉलिक अॅसिडची पर्याप्त मात्रा असते. आहारात याचे प्रमाण वाढवल्यास पांढरे केस लवकर काळे होऊ लागतील.
चीज आणि पनीर –
यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन B आणि कॅल्शिअम असते. आहारात याचे प्रमाण वाढवल्यास केस काळे आणि दाट होतील
मेथीदाणे –
यामध्ये आर्यन आणि फायबरचे पर्याप्त प्रमाण असते. रात्रभर मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्यापोटी हे पाणे प्यावे किंवा याने केस धुवावेत
हिरव्या पालेभाज्या –
यामधून फॉलिक अॅसिड, आयर्न आणि व्हिटॅमिन A ची पर्याप्त मात्र मिळेल. ज्यामुळे केस काळे आणि मजबूत होतील
दूध –
दररोज एक ग्लास दूध घेतल्यास प्रोटीन आणि कॅल्शिअम मिळेल. यामुळे केस चमकदार आणि मजबूत होण्यास मदत मिळेल. गायीच्या दूधानेही पांढरे केस काळे होऊ शकतात. गाईचे दूध केसांमध्ये लावल्याने नैसर्गिकरित्या केस काळे होतात. आठवड्यातुन एकदा हा प्रयोग केल्यास लवकरच तुमचे पांढरे केस काळे होतील.
ड्राय फ्रूट्स –
दररोज 6 बदाम, 10 मनुके, 1 अंजीर आणि 7 पिस्ते खावेत. यामधून मिळणार न्यूट्रिएंट्स केसांना काळे करण्यास मदत करतील
