दोन पिलर्सवर आहे जगातील सर्वात लहान देश, पाहा किती लोक राहतात?

जगात एक असा देश आहे की, तो दोन पिलर्सवर आहे. या देशाची लोकसंख्या केवळ २७ आहे.

इंग्लंडमधील सफोल्क समुद्र किनाऱ्यापासून १० किमी अंतरावर हा देश आहे. या देशाचे नाव आहे सीलॅंड. हा देश समुद्र किल्ल्याच्या दोन पिलर्सवर आहे.

रॉय बेट्स नावाची व्यक्ती या देशाचे राष्ट्रपती आहेत. या देशाला पंतप्रधान आणि मालक ही आहे. ९ ऑक्टोबर २०१२ मध्ये बेट्स यांनी स्वत:लाच सीलॅंड या देशाचे मालक म्हणून घोषित केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलगा मायकल या देशाचे प्रशासन संभाळत आहे.

या देशाला रफ फोर्ट म्हणूनही म्हटले जाते. याची बांधणी दुसऱ्या युद्धाच्यावेळी ब्रिटनने केली. या देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही. या देशाकडे साधन संपत्ती नाही. मात्र, या देशाचे चलन आणि स्टॅम्प तिकीट आहे.

दरवर्षी हा देश डोनेशनच्या माध्यमातून निधी गोळा करतो. पहिल्यावेळी हा देश असल्याचे समजले त्यावेळी मोठ्याप्रमाणात डोनेशन मिळाले. या देशाला पाहण्यासाठी लोक ये-जा करत असतात. दरम्यान, जगात सर्वात लहान देश वेटिकन सिटी आहे. याचे क्षेत्रफळ ०.४४ वर्ग किलोमीटर आहे. याची लोकसंख्या ८०० आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *