येमेनमध्ये दहशतवादी हल्ला;सहा सैनिक ठार

दक्षिण येमेनमधील अत्यंत महत्त्वपूर्ण शहर असलेल्या एडनमध्ये आज (बुधवार) घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान सहा येमेनी सैनिक ठार झाले.

एडन आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक असलेल्या खोर मस्कार जिल्ह्यामधील सैन्याच्या तळाच्या भागामध्ये दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली दोन वाहने घुसवून हा हल्ला घडविला. या हल्ल्यानंतर येथे सैन्य व दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री सुरु झाली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सैन्याकडून येथील तळाची नाकेबंदी करण्यात आली असून घटनास्थळी जादा कुमक धाडण्यात येत आहे.

एडनचे बंदर सध्या येथील सरकारशी एकनिष्ठ असलेल्या फौजेच्या नियंत्रणाखाली आहे. परंतु या देशाचा मोठा भाग आता हौथी बंडखोरांच्या सैन्याने ताब्यात घेतला असून; या व्यूहात्मक दृष्टया अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या बंदराच्या नियंत्रणासाठी रक्तरंजित संघर्ष करण्यात येत आहे. देशातील या संघर्षामुळे निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा अल कायदा या दहशतवादी संघटनेस झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *