काबूलमध्ये दहशतवादी हल्ला, ४० ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांकडून लष्करी बसवर आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला गुरूवारी दुपारच्या सुमारास करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, काबूल शहराजवळ हा हल्ला झाला. लष्कराच्या बसमध्ये नव्याने लष्करात भरती झालेले तरुण होते. ही बस वर्दक प्रांतातून सष्कराच्या जवानांना घेऊन काबुल येथे निघाली होती. यावेळी दहशतवाद्यांनी या बसला लक्ष्य केले.

या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लष्कराच्या आणखी एका गाडीवर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

काबूलमध्ये गेल्या आठवड्यातच कॅनडाच्या दुतावासाजवळ नेपाळी सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणा-या बसवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *