जामनेर तालुक्यातील एका गावात शिक्षक आणि सूनेचं काहीतरी चालू असल्याचा संशय सासूला आला.
सासूने टायमिंग साधलं आणि शिक्षकासोबत सुनेलं रंगेहात पकडलं, शिक्षकाचं नशीब चांगलं म्हणून तो पळून जाण्यास यशस्वी झाला असं गावकरी म्हणतात, आता या शिक्षकाची हकालपट्टी करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
ही घटना चार दिवसांपूर्वीची आहे, एक शिक्षक एका विवाहितेच्या प्रेमात पडला, तिला सतत फोन करणे, भेटणे अशा प्रेमलीला सुरू होत्या, याची कुणकुण सासूला लागली, सासूने टायमिंग साधत त्यांना रंगेहात पकडले आणि सूनेचा चेहराही चांगलाच गोरामोरा झाला.