बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान गोळी लागून जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला.
पवई येथे सैफ अली खानच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण चालू होते. रात्री चित्रपटातील अॅक्शन सीनचे चित्रिकरण सुरू असतांना त्याच्या हाताच्या अंगठ्याला गोळी लागली आणि तो जखमी झाला.
सैफ अली खानला तात्काळ कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सैफची दुखापत मोठी नसली तर या घटनेनंतर सेटवर गोंधळाचे वातावरण होते.
सध्या सैफच्या होम प्रॉडक्शन असलेल्या एका चित्रपटाचे पवईमध्ये चित्रिकरण सुरु होते. त्यावेळी हा प्रकार घडला.