काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात आठ जवान शहीद

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात आठ जवान शहीद तर ३६ जण जखमी झाले. तर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाले. येथून १४ किलोमीटरवरील पंपोर येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बसवर गोळीबार केला.

सीआरपीएफच्या जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाले तर पाच जवान शहीद झाले. जखमी जवानांना तातडीने लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले.

सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक नलीन प्रभात यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. सुरक्षा दलांनी तातडीने परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला.

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक के. राजेंद्र यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. हे दहशतवादी पाकिस्तानातून आले असावेत, अशी शक्यता आहे. गेल्या तीन आठवडय़ांत सुरक्षा दलांवर हल्ला होण्याची ही दुसरी घटना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *