ब्रिटन जनमत चाचणीचा परिणाम बाजरपेठेवर, रुपयासोबत पाऊंडही घसरला

ब्रिटन जनमत चाचणीचा परिणाम सेन्सेक्सवर झाला आहे. बाजार उघडण्यापुर्वीच म्हणजे प्री ओपनिंगलाच सेन्सेक्स 900 अंकांनी गडगडला आहे. मात्र बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स किंचित सुधारला आहे. निफ्टीमध्येही 286 अंकांची घसरण झाली आहे. निकाल येण्याअगोदर बाजार कोलमडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र निकाल आल्यानंतरच नेमकं चित्र स्पष्ट होईल. दरम्यान रुपया देखील घसरला असून डॉलरच्या तुलनेत 89 पैशांनी घसरण होऊन 68.17 वर पोहोचला आहे. ब्रेक्झिट मतदानाचा परिणाम पाऊंडवर देखील झाला असून 31 वर्षातील निच्चांक गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत पाऊंड 9 टक्क्यांनी घसरला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *