‘योग दिनाच्या नावाखाली मोदी यांचे राजकारण ‘

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षीपासून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यास सुरवात केली. दुसरा योग दिन मंगळवारी धुमधडाक्‍यात साजरा झाला. मात्र योगाच्या नावाखाली पंतप्रधान मोदी मनमानी राजकारण करीत असून, भाजप नेते “इव्हेंट मॅनेजमेंट‘मधील गुरू असल्याची टीका संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केली.
जगभर साजऱ्या होणाऱ्या योग दिनावर बोलताना “जेडीयू‘चे नेते संजयसिंह यांनी या कार्यक्रमावर केंद्र सरकार जनतेचा पैसा उधळत आहे, अशी टीका केली. योग दिन जगात अनेक वर्षांपासून साजरा होत आहे. मात्र भाजपचे नेते व पंतप्रधान मोदी त्याचे ब्रॅंडिंग करीत असल्याचे सांगून ते म्हणाले, “इव्हेंट मॅनेजमेंट‘चे गुरू आहे. कोट्यवधी रुपये त्यावर खर्च केले जात आहेत. “स्वच्छता अभियाना‘त नागरिकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. मात्र काही काळानंतर ही मोहीम बंद पडली. त्याचप्रमाणे योग दिनावर नाहक पैसा खर्च केला जात आहे, असेही संजयसिंह म्हणाले. 
 
“योग दिनाचा देखावा‘ 
योग दिनावर टीका करताना संजयसिंह म्हणाले, “”आमच्या पक्षाचे सदस्यही योगाभ्यास करतात; पण ते दिखाऊपणा करीत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केली, तर आपण योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ, असे बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी स्पष्ट केले होते.‘‘ यावरूनच योगाच्या आडून राजकारण केले जात असून, ही मोहीम फार काळ चालणार नाही, असे भाकीत त्यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *