भेडशी नदीच्या पुरात शेतक-याचा बुडून मृत्यू

भेडशी नदीच्या पुरात शेतक-याचा बुडून मृत्यू

दोडामार्ग तालुक्यातील उसप, पिकुळे खोकरल, साटेली-भेडशी परिसरात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे भेडशी नदीला पूर येऊन तुकाराम भागू जंगले (४५, रा. झरे- काजूळ धनगरवाडी) या शेतक-याचा बुडून मृत्यू झाला.

शुक्रवारी दुपारी भेडशी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस होऊन परिसरातील नद्यानाल्यांना पूर आला होता. दरम्यान, तुकाराम जंगले नदी पैलतीरी असलेल्या आपल्या शेतजमिनीत नांगरणीसाठी बैलजोडी घेऊन गेले होते.

उशिरा ते माघारी परताना झरेबांबर-बोडदे दरम्यानची नदी ओलांडत असताना ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. या वेळी त्यांच्यासोबत असलेली बैलजोडी मात्र घरी पोहोचली. मात्र ते घरी न आल्याने ग्रामस्थ व घरच्या मंडळींनी रात्री उशिरापर्यंत शोधाशोध सुरू केली.

दरम्यान, सकाळी जंगले यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर दुपारी साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *