आकाशच्या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग कडेकोट बंदोबस्तात

सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेला परश्या अर्थात आकाश ठोसर सध्या प्रसिद्धीच्या झोकात आलाय. सैराट सिनेमामुळे अवघ्या एका रात्रीत स्टार झालाय.

महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्याचे लाखो फॅन्स झालेत. त्यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुरलेले असतात. तरुणांच्या गळ्यातील तर तो ताईत झालाय.

ही प्रसिद्धी इतकी आहे की दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंगही कडेकोट बंदोबस्तात करावे लागतेय. आकाश सध्या महेश मांजरेकर यांच्या चित्रपटासाठी शूटिंग करतोय. मात्र आकाशच्या फॅन्समुळे शूटिंगसाठीही मोठा बंदोबस्त करण्यात आलाय.

आकाशची एक छबी टिपण्यासाठी शूटिंगच्या ठिकाणीही लोक मोठी गर्दी करतायत. यामुळे शूट करताना त्रास होत असल्याचे युनिटमधील एका सूत्राने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *