‘इसिस’चा म्होरक्या बगदादी ठार

इसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी हवाई हल्ल्यात मारला गेल्याचा दावा दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या वृत्त वाहिनीने केला आहे.

इराण आणि तुर्कस्तानच्या वृत्त वाहिन्यांनीही असाच दावा केला आहे. इराणी स्टेट मीडिया आणि तुर्की सरकारचे समर्थक वृत्तपत्र येनिस सफकने आयएसआयएसशी संबंधित वृत्तसंस्था अल-अमाकच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

अमाकने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, रक्कामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात रविवारी बगदादीचा मृत्यू झाला. सीरियाच्या रक्का येथील नाटोच्या हवाई हल्ल्यात बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे. बगदादीवर २५ मीलियन डॉलर म्हणजे १६० कोटी रुपयांचे बक्षीस आहे.

गुरुवारी बगदादी आणि इसिसचे इतर म्होरके गाड्यांमधून सीरिया येथून रक्का इथे गेले होते. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये बगदादीसोबत इसिसचे अनेक म्होरके जखमी झाल्याचे वृत्त आहे. असे इराकी वृत्त वाहिनी अल समारिका तसेच स्थानिक सूत्रांनी याला अनुमोदन दिले आहे. मात्र, नाटोने अद्याप याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *