राजनाथ सिंग मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार?

पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे.

भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनाथ सिंग यांना ही ऑफर दिल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अजून राजनाथ सिंग यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाही असंही समजतंय.

एक महिन्यांपूर्वीच मोदी आणि शाह यांच्याकडून ही ऑफर राजनाथ सिंग यांना दिल्याची माहिती आहे. याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र महिन्यापूर्वी अशी ऑफर करण्यात आली होती असं भाजपमधल्या सूत्रांनी सांगितलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *