सेल्फी काढताना तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू

सेल्फी काढताना तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू

मुरूड इथे सेल्फी काढताना पर्यटकाचा मृत्यू झालाय. मुरूडजवळच्या डोंगरी इथे सेल्फी काढताना तोल जाऊन दरीत पडल्याने पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. अभिजीत पवार असं या मृत पर्यटकाचं नाव आहे.

मुरूडजवळील समुद्रात असलेल्या जंजिरा किल्ल्यासह सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात त्याला जीव गमवावा लागला.  सातारा जिल्ह्यातील खंडाळा इथला रहिवासी असलेला अभिजीत मित्रांसोबत जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आला होता. तिथून परतताना एका उंच टेकडीवर उभे राहून किल्ल्यासोबत सेल्फी काढत असताना तोल जाऊन तो दरीत पडला. त्यात गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *