सध्या कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल ५२.५० डॉलर इतक्या वाढल्या आहेत. मे महिन्यात तेलाच्या किमती दोन डॉलरने वाढल्या तेव्हा पेट्रोल ३.४१ पैसेने वाढले होते.
गेल्या आठ दिवसांतच तेलाच्या किमती २ डॉलरने वाढल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे १५ जूनला तेल कंपन्यांची बैठक होणार असून त्यात पेट्रोलचा दर ३ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
कच्चे तेल महाग झाल्यावर सरकारकडे दोनच पर्याय आहेत. एक तर सरकार अबकारी शुल्क कमी करू शकते अथवा पेट्रोल -डिझेलचे दर वाढवू शकते. सध्या पेट्रोलवर अबकारी शुल्क प्रति लिटर २१ रु. ४८ पैसे आहे.