त्वचा निरोगी, नितळ आणि चमकदार करायची असेल तर त्यामागचे रहस्य डर्मेटोलॉजिस्ट्सनी सुचवलेले भारतातील क्रमांक १ चे सनक्रीन-सनक्रोज हेच क्रीम आहे. त्यामुळे त्वचेला तिन्हीत्रिकाळ सर्व मोसमांमध्ये निरोगी चमकदारपणा आणि तेज राहते. हे क्रीम आता भारतात रिटेल बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे.
सर्व वयोगटातील लोकांकरिता ते उपयुक्त आहे. सनक्रोजमधील वैज्ञानिक पद्धतीने तयार करण्यात आलेला तंत्रज्ञानाधारित फॉर्म्युला नॅनोनाईझ्ड आणि मायक्रोनाईझ्ड झिंक ऑक्साईडच्या सहाय्याने सूर्याच्या हानीकारक यूव्ही किरणांना त्वचेमध्ये खोलवर जाण्यापासून रोखतो.
सन फार्माच्या जागतिक उपभोक्ता हेल्थेकेअर विभागाचे उपाध्यक्ष आणि मुख्य सुबोध मारवा म्हणाले की, सनक्रोजसोबत आम्ही डम्रेटोलॉजी वर्गवारीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळे आम्हाला सनक्रीन वर्गवारीतील विपुल संधींचा लाभ घेता येणार आहे. आता सनक्रोज थेट उपभोक्त्यांपर्यंत पोहोचणार असल्याने डम्रेटोलॉजिस्ट्सनी सुचवलेला हा क्रमांक एकचा सनक्रीन ब्रँड आता सर्वाना उपलब्ध होणार आहे.
सनक्रोजची ब्रँड एॅम्बेसेडर दिया मिर्झा म्हणाली, माझा व्यवसायच असा आहे की, मला सदासर्वकाळ सुंदर दिसावे लागते. माझी त्वचा निरोगी आणि नितळ ठेवायची असेल तर मी कसेही हवामान असो, सनक्रीन लावल्याशिवाय बाहेर पडायचे नाही असा दंडक घालून घेतला आहे. सनक्रोज अॅक्वाजेल १०० ग्रॅम पॅक ३४५ रूपयांना उपलब्ध असेल.