हनिमूनवरुन परतल्यानंतर नवऱ्याचे गुपित उघडले आणि…

हनिमूनवरुन परतल्यानंतर नवऱ्याचे गुपित उघडले आणि…

काही दिवसांपूर्वी त्यांचं लग्न झालं होत आणि मॉरिशस येथून हनिमूनवरुन ते जोडपं परतलं होतं. नववधू आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. मात्र हनिमूनवरुन परतल्यानंतर तिचा नवरा जतिनने तिला जोरदार झटका दिला. २४ वर्षांचा पती त्याच्या ४२ वर्षांच्या प्रेयसीसोबत चक्क पळून गेला

मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरच्या गोरखपूर दत्त अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या निर्मित जैन २९ मेला मॉरिशियसहून पत्नीसह हनिमूनवरुन परतला. मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच तो त्याच्या ४२ वर्षांच्या प्रेयसीसोबत घरातून पळून गेला. जेव्हा ही गोष्ट नवविवाहितेला समजली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी नवविवाहितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.

निर्मित जैन त्याची प्रेयसी शिवदासानी यांचे दोन वर्षांपासून अफेयर सुरु होते. दोघांची लव्हस्टोरी संपूर्ण कटंगा परिसरात फेमस झाली होती. याप्रकरणी दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *