मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस

गोरेगावात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे, समाज सेवा शाखेने ही कारवाई केली आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून गोरेगाव परिसरात या सेक्स रॅकेटचा कारभार चालत होता.

पोलिसांनी केलेल्यां कारवाईत २ टीव्ही अभिनेत्री, २ मॉडेल आणि २ दलालांना ताब्याकत घेण्यांत आले आहे. गोरेगाव येथील एका आलीशान मॉल बाहेर त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडित मॉडेल आणि अभिनेत्रीचे फोटोही ताब्यात घेण्यात आले आहेत, हेच फोटो सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ग्राहकांना पाठवण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

यात अशा एका टीव्ही अभिनेत्रीचा समावेश आहे, जिने सावधान इंडिया या मालिकेत काम केले आहे.  या सेक्स रॅकेटमध्ये एका रात्रीसाठी ५० हजारांपासून १ लाख रुपये आकारले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. यात बडे व्यापारी, अधिकारी यांच्यासाठी हे सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *