मेव्हणीला घेऊन पळला पत्नीने धू धू धुतला, दोघांचे मुंडन करून फिरवलं

कौशंबीच्या सराय अकील वस्तीमध्ये सोमवारी एक व्यक्तीने आपल्या मेव्हणीशी अवैध संबध ठेवले. त्यानंतर तिला घेऊन फरार झाला. या फरार व्यक्तीला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडले.

दोघांनी घऱी आणून दोघांची खूप धुलाई केली. त्यानंतर पतीचे मुंडन करायला लावले आणि संपूर्ण गावात फिरविले.

प्रतारणा आणि अपमानाचा हा खेळ अनेक तास चालला. या प्रकाराची पोलिसांना कानोकान खबर नव्हती. या घटनेची माहिती अनेक तासांनंतर पोलिसांनी मिळाली. त्यांनंतर त्यांनी जीजा आणि मेव्हणीला ताब्यात घेतले.

प्रकरण असे होते…

सरायअकील गावातील एका युवकाचे शेजारच्या गावातील मुलीशी निकाह झाला. पण निकाह झाल्यावर युवकाला आपल्या विवाहीत मेव्हणीशी प्रेम झाले. मेव्हणीचा पती पानीपत येथे राहत होता. एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडलेल्या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय केला.

पतीने धोका दिल्यानंतर पत्नीने पतीचा शोध घेतला. तिला एका ठिकाणी पती आणि बहिण सापडले मग रागावलेल्या पत्नीने दोघांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांचे मुंडन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *