सलमान,लुलियाच्या लग्नाची तारीख ठरली

सलमान,लुलियाच्या लग्नाची तारीख ठरली

बॉलिवूडच्या दबंग खानच्या लग्नाविषयीच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसापासून होत आहेत. सलमान खान कधी लग्न करणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, आता चाहत्यांची ही उत्सुकता लवकरच संपणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सलमान खानच्या लग्नाचा मुहुर्त अखेर ठरला आहे. त्यामुळे सलमान आणि लुलिया वंतूर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोले जात होते. मात्र, अभिनेत्री प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला लुलियासोबत जाहीर हजेरी लावून सलमानने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सलमान खानच्या कुटुंबियांनी लग्नाची तारीख नक्की केली आहे. मिळालेल्या माहितीमुसार, २७ डिसेंबरला म्हणजे सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशी सलमान आणि लुलिया लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र, यावर सलमान किंवा त्याच्या कुटुंबांनी जाहीरपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *