पॅरिस येथून उड्डाण करून कैरोला निघालेले एक विमान आज (गुरुवार) पहाटे रडारवरून अचानक गायब झाले. ‘इजिप्त एअर‘ कंपनीचे हे विमान आहे.
कैरो येथील स्थानिक वेळेनुसार पहाटे पावणेतीन वाजता ‘इजिप्त एअर‘च्या एमएस-804 या विमानाचा रडार सोबतचा संपर्क तुटला.
इजिप्त एअर कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैरोच्या स्थानिक वेळेनुसार रात्री अकरा वाजता एमएस-804 या विमानाने पॅरिसहून उड्डाण केले. ते पावणेतीन तासात कैरो विमानतळावर पोचणे अपेक्षित होते.
या विमानात 59 प्रवासी व 10 कर्मचारी आहेत. हे विमान 37 हजार फुटावरून उडत असताना कैरोच्या हवाई हद्दीत 130 किलोमीटर आत पोचल्यावर त्याचा रडारसोबत संपर्क तुटला. या विमानाचा शोध घेण्यासाठी शोध व बचाव पथक तयार करण्यात आले आहे.