कानपूरमध्ये घर कोसळून महिला जखमी

कानपूरमध्ये अचानक घराचं छत कोसळून अनेक महिला जखमी झाल्याची घटना घडलीय. कानपूरच्या सिठमरा परिसरातही ही दुर्घटना झालीये.

या ठिकाणी एका लग्नाची वरात आली होती. ही वरात आणि वरातीमधला डान्स पाहण्यासाठी घराच्या छतावर 50 हून अधिक महिला जमल्या होत्या. या छतावर इतक्या महिला जमल्या की त्यांच्या वजनामुळं या घराचं छत पत्त्याप्रमाणे खाली कोसळलं.

यामुळं या दोन मजली घरातील इतर काही महिलाही खाली कोसळल्या. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी अनेक महिला मात्र जखमी झाल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *