खडवासला कालव्याला इंदापूरजवळील कौठाळे गावाजवळ मोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.
हे भगदाड बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करून ते दोन तासांनंतर पूर्णपणे बंद करण्यात आले, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी आभियंता बी. बी. लोहोर यांनी दिली.
दौंड-इंदापूरला खडकवासाला धरणातून ४ मे रोजी १ टीएमसी पाणी सोडण्यात आले. या पाणी सोडण्यावरून पुण्यातील राजकारण चांगलेच तापले होते.
सध्या पुणे शहरातील अनेक भागांत दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात दौंड-इंदापूरला सोडण्यात आलेल्या पाण्याची अशा प्रकरे नासाडी झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
