छत्तीसगडमध्ये खाजगी बस पुलावरून खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला तर अन्य ५० जण जखमी आहेत. ही घटना बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली.
ही बस रायपूरहून झारखंडमधील गाधवा येथे जात होती. समोरून येणा-या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बलरामपूर जिल्ह्यातील दालधोवा घाटात असलेल्या कोरड्या पुलावरून ही बस खाली कोसळली.
यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना अंबिकापूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सकाळपर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला तर अन्य तीनजणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्व पुरुषांचा समावेश आहे.
