गुजरातमध्ये आभाळ फाटलं, दोन दिवस पाऊस आणखी थैमान घालणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Share This:

गुजरातमध्ये आभाळ फाटलं, दोन दिवस पाऊस आणखी थैमान घालणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

राजस्थानमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण

दक्षिण-पूर्व राजस्थानमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे गुजरातमध्ये 24 आणि 25 जुलै या दोन दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कुठे-कुठे पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 26 ते 30 जुलै या काळात मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात 27 ते 30 जुलै या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात 24 ते 30 जुलै या काळात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर भारतात कुठे-कुठे पाऊस पडणार?

हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड या राज्यांमध्ये 24 ते 30 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पंजाब आणि हरियाणातही पावसाची शक्यता

पंजाबमध्ये पुढचे दोन दिवस आणि त्यानंतर 27 ते 30 जुलै या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये 28 ते 30 जुलै पावसाची शक्यता आहे.

राजस्थान आणि मध्य प्रदेशातही पावसाचा अंदाज

राजस्थानमध्ये पुढच्या दोन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशात 24-25 जुलै आणि त्यानंतर 27 ते 30 जुलै या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

देशातील ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता

अंदमान-निकोबार द्वीप समूह, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम, बिहार या जिल्यांमध्ये 30 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश या जिल्ह्यांमध्ये देखील 24 ते 30 जुलै या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.