मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर ब्लॉक, कोणत्या लोकलवर परिणाम? खोळंबा टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक

 मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान आणि पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान रविवारी ब्लॉक घोषित केला आहे.

मध्य रेल्वे

स्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार

मार्ग : अप आणि डाऊन धीमा

वेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५

परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, २० मिनिटे विलंबाने धावतील.

स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे

मार्ग : अप आणि डाऊन

वेळ : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०

परिणाम : ब्लॉकवेळेत सीएसएमटी ते वाशी /बेलापूर/पनवेलदरम्यान आणि सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ब्लॉकवेळेत पनवेल ते कुर्लादरम्यान २० मिनिटांच्या फरकाने विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावर वेळापत्रकानुसार लोकल उपलब्ध राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल

मार्ग : अप आणि डाऊन जलद

वेळ : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५

परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. काही २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

‘मुंबई लोकलची वाढती प्रवासी संख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची विविध कामे सुरू आहेत. सध्या दररोज धावणाऱ्या सुमारे तीन हजार २०० लोकल फेऱ्यांची संख्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून २०३०पर्यंत ३,५०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे,’ अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबई – सावंतवाडी एक्स्प्रेसच्या शुभारंभ कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *