ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र प्रसिद्ध केल्या प्रकरणी रायगड पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. या प्रकरणाचे बारामती कनेक्शन समोर आलंय. पोलिसांनी यात एकाला ताब्यात घेतले आहे. शुभम काळे नावाच्या तरुणाला रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. आज त्याला अलिबाग न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
