ज्येष्ठ पार्श्वगायिका व राणी मुखर्जीच्या सासू पामेला चोप्रा यांचं निधन

दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी व यशराज फिल्म्सचा सर्वेसर्वा व निर्माता आदित्य चोप्राच्या आई पामेला चोप्रा यांचं निधन झालं आहे. राणी मुखर्जीच्या सासू पामेला चोप्रा यांचे आज २० एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. पामेला या एक प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका होत्या. त्या चित्रपट लेखिका आणि निर्मात्या देखील होत्या.

 पामेला चोप्रा यांच्या अंत्यसंस्काराबद्दल अद्याप कोणतीही माहिती चोप्रा कुटुंबाकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान, पामेला चोप्रा अखेरच्या यशराज फिल्म्सची डॉक्युमेंटरी ‘द रोमॅंटिक्स’मध्ये दिसल्या होत्या. त्यात त्यांनी त्यांचे दिवंगत पती यश चोप्रा आणि त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले होते. रोमँटिक्समध्ये यश चोप्रा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल भाष्य करण्यात आलं होतं. तसेच पामेला यांच्याही योगदानाचा उल्लेख होता.

पामेला यांनी १९७० मध्ये यश चोप्रा यांच्याशी पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते. ते अरेंज मॅरेज होतं. त्यांना आदित्य आणि उदय चोप्रा ही दोन मुले आहेत. आदित्य हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. त्याने राणी मुखर्जीशी लग्न केले आहे. तर, उदय एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *