उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासणीच्या प्रणालीसाठीची निविदा प्रक्रिया

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदव्युत्तर पदवी  अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑनलाइन उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठीचे निविदा प्रक्रियेला सुरू केली असून, आता दुसऱ्या सत्राच्या परीक्षेपासून ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची यंत्रणा कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत.

राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. त्याच धर्तीवर निकाल जलद जाहीर व्हावेत आणि शैक्षणिक सत्र पूर्वपदावर येण्यासाठी पुणे विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची छायाप्रत करून त्या संगणक, लॅपटॉपद्वारे तपासता येतील. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेगाने होईल.  विद्यापीठाची शैक्षणिक सत्रातील विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर येण्याची शक्‍यता आहे.

उत्तरपत्रिकांच्या ऑनलाइन मूल्यांकनासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. महिनाभरात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सत्र परीक्षा सुरू होत आहे. जसे परीक्षा सुरू होतील, त्याच वेळेपासून ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे वेळेत निकाल लागेल. तसेच ऑनलाइन तपासणी असल्याने निकालाचे गुणपत्रिकाही छपाईही वेळेपूर्वीच होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *