शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईच्या घरी फोन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  याची पोलिसांनी दखल घेतली आहे. काल पवार यांचा वाढदिवस झाला.  त्यानंतर त्यांना हा फोन आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मुंबईच्या निवासस्थानी फोनवरुन आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून पवार यांना धमकीचा फोन आला आहे. पवार यांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली आहे. पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काल 12 डिसेंबर रोजी पवारांचा वाढदिवस होता. अशीवेळी या धमकीचा फोन आला. या धमकीच्या फोनची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

याआधीही शरद पवार यांना धमकी

दरम्यान, याआधीही शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या तरुणाने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली. त्यानंतर निखिल भामरे या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. हा तरुण बागलाणकर या युजरनेमचा वापर करत होता. त्यांने आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये लिहिलं होतं, ‘वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग.’ या ट्विटवरून जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत कठोर कारवाईची मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *