कर्करोग रुग्णांना पूरक अश्या पाककृतींचा “अन्न हे पूर्णब्रम्ह ” पाककृती संग्रह साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे अनोख्या पद्धतीने प्रकाशित

कर्करोग रुग्णांना पूरक अश्या पाककृतींचा “अन्न हे पूर्णब्रम्ह ” पाककृती संग्रह साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे अनोख्या पद्धतीने प्रकाशित

आपल्या पाककृती नैपुण्याने सर्वश्रुत असणाऱ्या उमा काटदरे लिखित “अन्न हे पूर्णब्रम्ह ” हा पाककृती संग्रह साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे अनोख्या पद्धतीने प्रकाशित झाला .

सध्या सगळीकडे लग्नाचा हंगामा सुरु असून आहे.आपण समाजला गरजेचा विचार उपस्थितांना समोर मांडून भावी आयुष्याची सुरवात करावी असा मानस राखून मनाली काटदरे आणि अभिराम देशमुख ह्यांनी आपल्या लग्नात खाद्यसंस्कृती आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा संदेश,लग्न समारंभात पुस्तक प्रकाशनातून दिला. कर्करोग रुग्णांना पूरक पाककृतींची माहिती समंजस व्हावी याकरिता पुस्तकाच्या पुस्तक प्रकाशनाच्या समाजभान राखण्याचा अनोखा प्रयत्न काटदरे आणि देशमुख कुटुंबीयांनी केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्करोग रुग्णांना पूरक अश्या पाककृतींचा समावेश ह्यात करण्यात आला आहे.लहान वयाच्या मुलांपासून वयोवृद्धांना खायला आवडतील आणि अत्यावश्यक पोषणमूल्ये मिळतील अश्या पाककृती सहज आणि सोप्प्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत.पुस्तकाची रचना वाचकांना सोयीची व्हावी म्हणून १५ नाविन्यपूर्ण विभागात केली आहे.लहानमुलांसाठी नाश्ता ,उपवासाचे पदार्थ ,विविध प्रकारचे भाज्या ,डाळी , भात , डोसे असून खास मधुमेह असणाऱ्यांसाठी किंवा वजन कमी करू पाहणाऱ्यांसाठी सलाड्स आणि इतर विभाग बनविण्यात आले आहे.कमीत कमी सामुग्रीत जास्तीत जास्त पोषणमूल्ये कशी मिळतील ह्याची काळजी घेतलेली आहे.
उमा काटदरे ह्यांनी आपल्या मिनी केटरिंगच्या व्यवसायातील दीर्घ अनुभवाद्वारे ह्या पुस्तकाचे लिखाण केले असून खाद्यक्षेत्रात त्यांची ओळख सुगरण म्हणून आहे.विविध विभागातील संस्थांच्या खाद्याविषयक स्पर्धांमध्ये त्यांना अनेक पारितोषिके मिळालेली आहेत.आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला व्हावा या हेतूने आपण पुस्तक लिहायला घेतले असे त्या आवर्जून सांगतात.कर्क रोग्यांसाठी आहाराचे महत्व सर्वश्रुत आहे पण त्याविषयी किंवा तस्सम पाककृतीं बद्दल अजूनही समाजात जागरूकता नाही.
सदर पुस्तकाच्या निर्मितीतून समाजभान राखण्याच्या साहित्यसंपदाचा प्रयत्न असे मनोगत संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी केले.नवीन पिढयांना आपल्या खाद्यसंस्कृतीची ओळख होऊन घरो घरात हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शन करेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *