डॉक्टर की बाऊन्सर! कर्मचाऱ्याला अमानुष मारहाणीचा VIDEO व्हायरल

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोग्य अधिकारी डॉक्टर कळस्कर यांनी तिथल्याच एका कर्मचाऱ्याला काठी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हा सर्व प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव नारायण उइके असं असून त्याने गोबरवाहि पोलीस  स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या गोबरवाही आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी सागर कळस्कर यांनी चपराशी नारायण उईके यांना लाथा बुक्यांनी 22 मार्चला मारहाण केली होती. पोलिसांनी या प्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे चपराशी यांनी दारू पिऊन रुग्णालयात येत असल्याचं डॉक्टर कळस्कर यांचं म्हणणं आहे. पण अशा पद्धतीने अमानुष मारहाण करणं एका डॉक्टरला अशोभनीय आहे. मारहाण करणाऱ्या डॉक्टरवर कडक कारवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *