आता लहान मुलांनाही मिळणार कोरोनाची लस. आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी. कोरोनावर मात करण्याचासाठी प्रतिबंधात्मक लस नागरीकांना देण्यात आली. सुरूवातीला ही लस 60 वर्षांवरील व्यक्तींना देण्यात आली. त्यानंतर 45 वय वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सरकारने परवानगी दिली. यानंतर 18 वर्षांवरील तरूणांना लस देण्यास मंजूरी दिली. आता 2 ते 18 वय वर्ष गटातील मुलांना लस देण्यास परवानगी दिली आहे.
2 ते 18 वर्षांच्या मुलांवर कोरोना लशीची चाचणी करण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आली आहे असं वृत्त पीटीआयने दिले होते. लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आल्याचं पीटीआयने सांगितले होते. देशातील विविध ठिकाणी एकूण 525 लहान मुलांवर ही चाचणी करण्यात आली.
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे
– आता लहान मुलांनाही मिळणार कोरोनाची लस
– 2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी
– मुलांच्या लसीकरणाला DCGIची परवानगी
– मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा

