सावत्र पित्याकडून पाच वर्षीय बालिकेला चटके

जाधव संकुल भागात सावत्र पित्याने पाच वर्षांच्या मुलीला किरकोळ कारणावरून मारहाण करीत, अंगावर चटके दिले. संशयित देवीदास शेवाळे यास सातपूर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर परिसरात राहणाऱ्या सदर व्यक्तीने किरकोळ कारणावरुन आपल्या पाच वर्षीय सावत्र मुलीला मारहाण केली. यावेळी त्याने तिच्या अंगावर चटकेही दिले. याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती होताच त्याने मुलीला मूळ गावाकडे नेवून डांबून ठेवल्याचे समोर आले. नागरिकांनी गावाला जाऊन शोधले असता त्याने मुलीला आपल्या आजीच्या घरी न ठेवता वेगळ्या घरात पलंगाच्या खाली लपवून ठेवल्याचे समोर आले. संशयित आरोपीला सातपूर पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. आय. पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *