राज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

राज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा  अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुण्यात पावसाने विश्रांती घेतली पाहायला मिळत आहे. तर यवतमाळमध्ये जनावरं गेली वाहून तर जळगावात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

या आठवड्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची शक्यता आहे. यावेळी राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

याच आठवड्यात राजस्थानातून मान्सूनचा परतीचा पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात चांगला पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *