अचानक कारचा यू टर्न, दोघा बाईकस्वरांचा मृत्यू

बातमी अपघाताची. लोअर परळ ब्रिजवर कारने अचानक यू टर्न  घेतल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात बाईकवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.

लोअर परळ येथील फिनिक्स मॉलचे समोरील ब्रीजवर दादरकडून रखांगी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने अचानक यू टर्न घेतला. त्यावेळी रखांगी चौकाकडून दादरकडे जाणारे दोघे बाईकस्वार खाली कोसळले. रस्त्यावर जोरात आपटल्याने बाईकवर असलेल्या दोन निष्पापांचा बळी गेला. या सर्व घटनेनंतर कार चालक फरार झाला आहे. त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *