आरे कॉलनीत लावलेल्या सापळ्यात अडकला बिबट्या; भल्या पहाटे वनविभागाची कारवाई!

आरे कॉलनीत लावलेल्या सापळ्यात अडकला बिबट्या; भल्या पहाटे वनविभागाची कारवाई!

आरे कॉलनीमध्ये याआधी अनेकदा बिबट्याचं स्थानिकांना दर्शन झालं आहे. वन परिसर असल्यामुळे वन्यजीवांचा या भागात अधून-मधून वावर दिसून येतो. असाच एक बिबट्या दोन दिवसांपूर्वी आरे कॉलनीमध्ये दिसून आला होता. या बिबट्याने आरे कॉलनीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेवर झडप घातल्याचं सीसीटीव्हीमधून समोर आल्यानंतर वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने कारवाई सुरू केली. या कारवाईला आज पहाट यश आलं असून या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं आहे. आरे कॉलनी आणि आसपासच्या परिसरात एकूण ७ जणांवर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा बिबट्या त्याच्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अडकल्याचं समजल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर हा बिबट्या लोकांवर हल्ले करत असल्याचं समोर आलं होतं. नुकताच बुधवारी या बिबट्याने आरे कॉलनीमध्ये एका ५५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर हल्ला केला होता. त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री एका १९ वर्षीय तरुणावर देखील बिबट्याचा हल्ला झाल्याची माहिती मिळाली हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *