दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीला रॉकेल टाकून जिवंत जाळले

दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जिवंत जाळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील शांतिनगर परिसरात घडली आहे. कुंटूबाने तक्रार दाखल केल्यानंतर शांतिनगर पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज शेख (वय 38) आणि पत्नी रुक्साना शेख (वय 35) यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर तो पत्नीवर शारीरिक अत्याचार करीत असे. गुरूवारी देखील दारूच्या पैशावरून दोघांमध्ये वाद झाला होता.

गुरूवारी पत्नी रुक्सानाला दारू पिण्यासाठी फिरोजने पैशांची मागणी केली. पत्नीच्या नकारानंतर तो तिच्याशी वाद घालू लागला. रागाच्या भरात त्याने तिच्यावर रॉकेल ओतले. आणि जिवंत पेटवले. रुक्सानाने या दरम्यान पळून जाण्याचा प्रयत्नही केला. आजुबाजूच्यांनीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत ती 90 टक्के भाजली होती. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

आरोपी फिरोज शेखवर शांतिनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *