कल्याण हादरले; शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

डोंबिवलीत अल्पवयीन तरुणीवर सामुहिक बलात्काराच्या घटनेने शहर हादरलेले असतानाच कल्याणात खाजगी शिकविणी घेणाऱ्या शिक्षकाने एका ८ वर्षीय बालिकेवर लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी मूदर फक्रुद्दीन तालवाला ४२ या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
कल्याण पश्चिमेकडे राहणारी ८ वर्षीय चिमुरडी एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या पती पत्नीकडे शिकवणीसाठी जात होती. दीड महिन्यापूर्वी मुदर तालवाला याची पत्नी बाहेरगावी गेली असून तेव्हापासून मुदर एकटाच विद्यार्थ्याची शिकवणी घेत होता. मात्र यातील एका ८ वर्षीय चिमुरडीशी शिकवणीदरम्यान गैरवर्तन करत मुदर याने तिच्याशी लैगिक अत्याचार केला.

दीड महिन्यापासून हा प्रकार सुरु असल्याने घाबरलेल्या चिमुरडीने शिकवणीला जाण्यास नकार देत घडलेली घटना आपल्या आईला सांगताच आईने विकृत मुदर तालवाला विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तालवाला याला अटक केल्याचे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *