मुंबईला डेंग्यूचा ‘ताप’

मुंबईला डेंग्यूचा ‘ताप’

करोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: डेंग्यूची साथ पसरत चालली असून तापाने मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत जुलैच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जवळपास चौपटीने वाढली आहे.

शहरात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. अधूनमधून येणाऱ्या या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी डासांची पैदास वाढली असून त्यामुळे गेल्या महिनाभरात डेंग्यूचा प्रसार मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. जुलैमध्ये डेंग्यूचे २८ रुग्ण होते.

ऑगस्टच्या आकडेवारीनुसार ही संख्या आता १३२ वर गेली आहे. जानेवारी ते ऑगस्ट डेंग्यूच्या एकूण रुग्णांची संख्या २०९ झाली आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण १२९ होते. परंतु २०१९ च्या तुलनेत मात्र कमी आहे. हिवतापाच्या रुग्णांची संख्याही किंचित वाढली असून ऑगस्टमध्ये ७९० रुग्ण आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *