ठाण्यात लसीकरणाच्या दहा लाख मात्रा पूर्ण

ठाण्यात लसीकरणाच्या दहा लाख मात्रा पूर्ण

अपुऱ्या लससाठय़ामुळे रडतखडतपणे सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला गेल्या काही दिवसांपासून वेग आला असतानाच ठाणे महापालिकेने मंगळवारी दहा लाख लशींच्या मात्रांचा टप्पा पूर्ण केला. यामध्ये ४ लाख ७० हजार २८९ महिला तर, ५ लाख ३० हजार ३२५ पुरुषांचे लसीकरण करण्यात आले. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले असून येत्या काही दिवसांत लसीकरणाच्या आकडय़ात वाढ होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध केंद्रांवर दररोज करोना प्रतिबंधक लस देण्यात येते. शासनाकडून लशींचा पुरेसा साठा मिळत नसल्यामुळे पालिकेला अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून हे चित्र बदलेले आहे. पालिकेला पुरेसा लशींचा साठा उपलब्ध होत आहे. यामुळे रडतखडतपणे सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. तसेच लसीकरणामध्ये महिलांची संख्या कमी असल्याचे लक्षात येताच पालिकेने आठवडय़ातून एकदा महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच पालिकेने आता मंगळवारी दहा लाख लशींच्या मात्रांचा टप्पा पूर्ण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *