करोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजपा आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतरही मुंबई, ठाण्यात आज काही ठिकाणी हा मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतरही मुंबई, ठाण्यात आज काही ठिकाणी हा मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी मंडळांची बैठक घेत करोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यासह, मुंबईत अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी उभारली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला.
