ठाण्यात फेरीवाल्यांची दादागिरी, महिला सहाय्यक आयुक्तांवर चाकूने हल्ला

ठाण्यात फेरीवाल्यांची दादागिरी, महिला सहाय्यक आयुक्तांवर चाकूने हल्ला

ठाणे महानगर पालिका  हद्दीतील माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यानी (Hawkers) हल्ला केला. अवैध  फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असताना हा हल्ला करण्यात आला. कल्पिता पिंपळे यांच्यावर ठाण्यातील वेदांत इस्पितळात (Vedant Hospital) उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांचे बॉडीगार्डही जखमी झाले आहेत.

घटनस्थळी स्थानिक पोलीस दाखल झाले असून हल्ला करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाल्याने ठाणे महानगरपालिकेने कारवाईची भूमिका घेतली होती. याचाच भाग म्हणून आज माजिवडा-मानपाडा परिसरामध्ये फेरीवाल्यांवर कारवाई सुरु करण्यात आली होती.

या कारवाई दरम्यान, एका फेरीवाल्याने कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. पालिका अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ठाण्यात पालिका अधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांकडून हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *