पित्ताशयावरील शस्त्रक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
शरद पवार यांना काल रात्री पुन्हा एकदा ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी मागील महिन्यात पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांच्यावर एन्डोस्कोपी करुन त्यांच्या पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ११ एप्रिल रोजी पुन्हा त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्तशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र, काल पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
